artist 01OMKAR SWARUPA Lyrics

ओंकार स्वरुपा, सद्‍गुरु समर्था
अनाथाच्या नाथा, तुज नमो
तुज नमो, तुज नमो, तुज नमो

नमो मायबापा, गुरुकृपा घना
तोडीया बंधना मायामोहा
मोहोजाळ माझे कोण नीरक्षीर
तुजविण दयाळा सद्‍गुरु राया

सद्‍गुरु राया माझा आनंद सागर
त्रैलोक्या आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्या पुढे उदास चंद्ररवी
रवी, शशी, अग्नि, नेणती ज्या रुपा
स्वप्रकाशरुपा नेणे वेद

एका जनार्दनी, गुरु परब्रम्ह
तयाचे पै नाम सदा मुखी
तुज नमो, तुज नमो तुज नमो

See also:

68
68.84
fiona apple wild horses Lyrics
The Church Lost My Touch Lyrics