Sang kadhi kalnar tula Lyrics

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणार्‍या फुलातला

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणार्‍या सुरातला

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला, नाचणार्‍या जळातला

जुळता डोळे एकावेळी, धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला

See also:

84
84.24
AmenoSKuartO Arlekina Lyrics
陳奕迅 我有我愛你 Lyrics