Akshay Airanichya Deva Tula Lyrics

ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे-(2)
ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे-(2)

लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं-(2)
जीनं व्होवं अबरुचं, धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असू दे..
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे.

लक्शिमिच्या हतातली चवरि व्हावी वर खाली-(2)
इडा पीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरसंग
किरपा तुजी, भात्यांतल्या सुरसंगं गाउ दे..
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे.

सूक थोडं, दुक्क भारी, दुनिया ही भली-बुरी-(2)
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउ दे..
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे
ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे.

See also:

93
93.66
Thuy Chi - ft - M4U Xe Dap - ThuyChi Lyrics
ไม่มีใครรู้ เป๊ก ผลิตโชค Lyrics